संभाजीराजेंच्या भाषणानंतर पत्नी संयोगिताराजे का झाल्या भावनाविवश ?

660 0

मुंबई- मराठा आरक्षणाच्या मुद्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईत बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ‘मला काहीही झालं तर चालेल पण तुम्हाला काही झालं नाही पाहिजे’ असं संभाजीराजे म्हणताच संभाजीराजेंच्या पत्नी संयोगीता राजे यांना अश्रू अनावर झाले.

संभाजीराजे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संभाजीराजे यांनी जोरदार भाषण करत सरकारला इशारा दिला. संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत भाषण करून धीर दिला. ‘मी केलेलं हे उपोषण माझ्या निर्णयाने कदाचित माझ्या घरच्यांना हा निर्णय पटलेला नाही, पण मी उपोषण करतोय. मला काहीही झालं तर चालेल पण तुम्हाला काही झालं नाही पाहिजे’ असं म्हणत संभाजीराजे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केलं.

त्यावेळी समोर बसलेल्या संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीता राजे या देखील भावनाविवश झालेल्या पाहायला मिळाल्या. पत्नी संयोगीता राजे यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून कार्यकर्त्यांनाही गहिवरून आले.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide