संजय राऊत यांचा अर्थर रोड कारागृहामध्ये 4 ऑक्टोबर पर्यंत मुक्काम वाढला

267 0

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड जेल मधील कारागृहामध्ये 4 ऑक्टोबर पर्यंत मुक्काम पुन्हा एकदा वाढला आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणांमध्ये सध्या संजय राऊत हे आर्थर रोड जेल मध्ये आहेत. 31 जुलै रोजी खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. 

अधिक वाचा : CHANDRASHEKHAR BAVANKULE : म्हणून राज ठाकरे आले होते …! या भेटीत राजकीय चर्चा…

दरम्यान चार दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात ईडीने पुरवणी आरोप पत्र दाखल केले आहे. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जातात. पत्राचाळ घोटाळ्यामध्ये संजय राऊत यांचा देखील प्रवीण राऊत यांच्यासह हात असल्याचे इडीने यापूर्वी सांगितले होते.

 

याच पैशातून अलिबाग मध्ये त्यांनी जमीन देखील खरेदी केली असल्याचा संशय इडीला होता. याप्रकरणी सोमवारी संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये पुन्हा एकदा 4 ऑक्टोबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!