SANJAY RAUT : पद्मभूषण पुरस्कार बाळासाहेब ठाकरेंना का नाही ? VIDEO

1152 0

मुंबई : मुलायम सिंग यादव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करताना म्हंटले आहे कि, त्याच्याबाबत आम्हाला आक्षेप नाही. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने राम मंदिर बाबत भूमिका घेतील त्यावर आमचा आक्षेप आहे विरोध आहे. बाकी मुलायम सिंग यादव हे मोठे नेते आहे.

अधिक वाचा : #PUNE : कसबा पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी ! केंद्रीय निवड समितीकडे ‘या’ 5 नावांचा प्रस्ताव

आयोध्या मधील जे कांड झाले त्याबाबत आमचा मुलायम सिंग यादव यांना विरोध आहे. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचार यावेळी का केला नाही ? बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी बाबरी बाबत कडवट भूमिका घेतली होती. बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही ते चित्र लावले आम्ही त्यांच्या विचारांचे वारसदार अशा पिपाण्या वाजून चालत नाही. राष्ट्रीय स्तरावरती बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान सध्याचे सरकार करत आहे का ? हे पाहावे लागेल.

अधिक वाचा : #FRAUD : बंगला खरेदी करण्याच्या बहाण्याने बनावट कागदपत्र बनवून बँकेतून घेतले 2 कोटी 21 लाखांचे गृह कर्ज, मालकाच्या लक्षात आल्यावर …

जेव्हा त्यांच्या सोयीचे सर्वे असतात तेव्हा त्यांना हवे असतात. राष्ट्रीय सर्वे हा भाजपच्या बाजूने आहे. हा त्यांना हवा आहे, मात्र महाराष्ट्रातला सर्वे त्यांच्या विरोधात आहे. म्हणून त्यांना नको वाटत आहे. त्या सर्वेनुसार लोकसभेत 34 जागा मिळतील, असा अनुमान आहे. तर महाविकास आघाडीला साधारण 40 ते 45 जागा मिळतील.

Share This News
error: Content is protected !!