डोक्यावरुन खूप पाणी गेलंय, आता बघाच; भाजपचे साडेतीन नेते कोठडीत असतील – संजय राऊत (व्हिडिओ)

246 0

नवी दिल्ली- आम्ही खूप सहन केलं आम्ही, बरबाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय ? आता बघाच, असा खणखणीत इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे. उद्या शिवसेना पत्रकार परिषद घेऊन उद्या सर्व गोष्टींची उत्तरे दिली जातील असे राऊत यांनी म्हटले आहे.

या पत्रकार परिषदेला पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असणार आहेत. महाराष्ट्रातील भाजप नेते ‘आज हे मंत्री जातील, ते मंत्री जातील’ अशा धमक्या देत आहेत. मात्र, या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यांना कोठडीत ठेवण्यात आले. भाजपच्या त्या साडे तीन नेत्यांना त्याच कोठडीत राहण्याची व्यवस्था होत आहे. ‘हमाम मै सब नंगे होते है’ हे भाजपने लक्षात घ्यावं. असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचं ते करा आता मी घाबरणार नाही, असं राऊतांनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्याच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide