‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या पुणे शहर प्रसिद्धीप्रमुखपदी संजय अगरवाल यांची नियुक्ती

438 0

पुणे – सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संजय अगरवाल यांची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या पुणे शहर प्रसिद्धीप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख मा.अजय भोसले आणि पुणे शहरप्रमुख, माजी नगरसेवक मा.प्रमोद (नाना) भानगिरे यांनी संजय अगरवाल यांची नियुक्ती केली असून, राज्याचे उद्योगमंत्री मा. उदयजी सामंत यांच्या हस्ते अगरवाल यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्ष वाढीच्या कार्यात अगरवाल जबाबदारीने पद सांभाळतील, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला.

पुणे शहराच्या राजकारण आणि समाजकारणात संजय अगरवाल गेली तीस वर्षे कार्यरत आहेत. व्यापार, शिक्षणक्षेत्र यातील समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. गेली वीस वर्षे ते पत्रकारितेच्याही क्षेत्रात असून, संपादकपद भूषवीत आहेत. विविध प्रसारमाध्यमांविषयी त्यांचा अभ्यास असून, जनसंपर्कही दांडगा आहे.

महाराष्ट्राचे मुख्य मंत्री मा.एकनाथजी शिंदे आणि पक्ष यांचे कार्य, धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. नेत्यांच्या विश्वासास मी पात्र ठरेन, असे मनोगत संजय अगरवाल यांनी व्यक्त केले.

Share This News
error: Content is protected !!