तो मी नव्हेच ! ‘आप’ल्याला यामध्ये ओढू नका’ अभिनेता संदीप पाठक यांनी का केले स्पष्ट?

921 40

मुंबई- सध्या मराठी अभिनेता संदीप पाठक चर्चेत आला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आल्यानंतर पंजाब राजकारणात चाणक्य म्हणून ज्यांची राजकारणात ओळख आहे, त्या संदीप पाठक यांना ‘आप’ने पंजाबमधून राज्यसभेचं तिकीट दिले आहे. मात्र तो संदीप पाठक मी नव्हे असं अभिनेता संदीप पाठक यांनी स्पष्ट केले आहे. कारण राज्यसभेसाठी त्यांना उमेदवारी दिल्याबाबतच्या ट्विटवर अभिनेता संदीप पाठक यांचा फोटो वापरण्यात आलेला आहे.

‘आप’ने राज्यसभेसाठी त्यांच्या पक्षाचे नेते संदीप पाठक यांच्या नावाची घोषणा केली. पण बऱ्याच ठिकाणी अभिनेता संदीप पाठकचा फोटो वापरला जातोय.
त्यावर आता संदीप पाठकने प्रतिक्रिया दिली आहे.

आप उमेदवार म्हणून त्याचे फोटो वापरण्यावर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. “तो मी नव्हेच! ‘आप’चे डॉ. संदीप पाठक ह्यांची पंजाबमधून राज्यसभेवर निवड झाली आहे माझी नाही. बऱ्याच ठिकाणी, काही चॅनल वर माझे फोटो वापरत आहेत. ‘आप’ल्याला ह्यात ओढू नका!”, असं ट्विट संदीप पाठक ने केलं आहे.

 

यात त्याने आम आदमी पक्षाला आणि दिल्लीचे मुख्यमंत्री, आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना टॅग केलंय. संदीपच्या या ट्विटच्या कमेंटबॉक्समध्ये अनेकांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!