शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसाठी संभाजी ब्रिगेडची रणनीती ; मराठा सेवा संघात मोठे बदल

512 0

मुंबई : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भाजप आणि शिंदे सरकार स्थापन झाले . आता 2024 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी एकीकडे युद्धनीती आखण्यास सुरुवात केली असून , शिवसेनेनेही संभाजी ब्रिगेड सोबत युती करून एक नवीन राजकीय समीकरण आखले आहे. दरम्यान आता 2024 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने देखील शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेच्या इराद्याने मराठा सेवा संघामध्ये मोठे बदल केले आहेत.

शिवसेनेला पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी संभाजी ब्रिगेडने विडा उचलला असून, त्यासाठी मोठ्या हालचाली देखील सुरू झाला असल्याचे समजते . दरम्यान मराठा सेवा संघामध्ये 35 वर्ष वयाच्या आतील सरकारी कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी देण्याचा विचार सुरू असून 30 टक्के अनुभवी पदाधिकारी मराठा सेवा संघाच्या पदावर कार्यरत राहतील.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड भविष्यातील सर्व निवडणुकांमध्ये सोबत लढणार आहेत. ” शिवसेनेसोबत युती करत असताना शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या सामाजिक भूमिका वेगळ्या असू शकतात . प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार संभाजी ब्रिगेडने नेहमी स्वीकारले आहेत . असे म्हणून राजकारणात सर्व काही शक्य आणि क्षम्य आहे. ” असे देखील संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!