Breaking News

बंडातात्या कराडकर यांच्या ‘त्या’ वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल (व्हिडिओ)

307 0

पुणे- बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला असून याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.

त्याबाबत सातारा पोलिसांनी या वक्तव्याबाबत बंडातात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करुन याचा अहवाल 48 तासाच्या आत अहवाल आयोगास सादर करावा.

तसेच बंडातात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा असे निर्देश देखील रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.

Share This News
error: Content is protected !!