Ministry of Defence : निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची भारताच्या नव्या सीडीएस पदी नियुक्ती

410 0

नवी दिल्ली : भारत सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून नियुक्ती केली. संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, ते भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहणार आहेत.

हेलिकॉप्टर अपघातात सीडीसीचे माजी जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाल्यानंतर देशाचे लष्करी पद 9 महिने रिक्त होते, त्याची जबाबदारी आता निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी ४० वर्षांच्या कारकीर्दीत अनेक कमांड सांभाळल्या आहेत आणि जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील बंडखोरीविरोधी कारवायांचा त्यांना मोठा अनुभव आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide