“आपल्या जन्मदात्या ‘आईची’ आणि ‘बायकोची’ ‘बहिणीची’ आठवण असू द्या…! महिलांची माफी मागा…! ” गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून विद्या चव्हाण संतापल्या…

317 0

मुंबई : गुलाबराव पाटील यांच्यावर विद्या चव्हाण यांनी संतप्त टीका केली आहे . यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण म्हणाल्या कि , ” गुलाबराव पाटील यांचं आजचं वक्तव्य अत्यंत धक्कादायक होतं. त्यांनी गायनॅकॉलॉजिस्ट हे हातापायाचे डॉक्टर नसून आणि आम्हीच फार मोठे डॉक्टर आहोत असं म्हणाले अशा प्रकारचे वक्तव्य करू नका…” अशा शब्दात त्यांनी गुलाबराव पाटील यांना ताकीद दिली आहे .

” 50 कोटी घेतलेले जे सर्व गद्दार लोक आहेत , त्यांचा जर फार सन्मान होतोय असं जर तुम्हाला वाटत असेल. तर त्या भ्रमात राहू नका . कारण चॅनलवर काही दाखवलं ते तुमचं कर्तृत्व नव्हतं , तो तुमचा पराक्रम नव्हता. तुमच्या मतदारसंघातल्या लोकांचे अनेक महागाईचे प्रश्न बेरोजगारीचे प्रश्न असे प्रश्न प्रलंबित असताना तुमच्या मतदारसंघांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आवाज उठवत नाही . तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कसे राहत होता. तुम्ही कशी गद्दारी केली तुम्ही कसे 50 कोटी घेतले हे तुमचं कर्तृत्व नाहीये तरी कृपा करून तुम्ही या भ्रमात राहू नका . चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणारी प्रसिद्धी नसून ती कुप्रसिद्धी आहे.” असेही त्या म्हणाल्या आहेत.

” महिलांविषयी तुम्ही जे काही बोललेले आहात तुमच्या घरात जर आया-बहिणी असतील तुमची बायको असेल तर त्यांना विचारा की हे वक्तव्य कसं आहे . आणि असं वक्तव्य करणाऱ्या गुलाबरावांनी समस्त महाराष्ट्रातल्या महिलांची माफी मागितली पाहिजे, ” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे करते आहे असे विद्या चव्हाण यांनी म्हणाल्या आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!