गोदामात लपवून ठेवलेला रक्तचंदनाचा कोट्यवधी रुपयांचा साठा जप्त, अहमदनगर पोलिसांची कारवाई

469 0

अहमदनगर – नगर एमआयडीसीमधील एका गोदामातून लपवून ठेवलेला साडेसात टन रक्तचंदनाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. या रक्तचंदनाची किंमत सुमारे सव्वातीन कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. हा साठा बटाट्याच्या गोण्यांखाली लपवून ठेवण्यात आला होता.

सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिलेल्या माहितीनुसार एमआयडीसी परिसरातील सदाशिव झावरे यांच्या मालकीच्या गोदामात बेकायदेशीररित्या चोरून आणलेले रक्तचंदन ठेवलं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी या गोदामावर छापा टाकला. छापा घातला.

गोदामात बटाट्याच्या गोण्यांखाली रक्तचंदन लपवून ठेवल्याचे आढळून आले. त्याचे वजन साडेसात टन असून या रक्तचंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे तीन कोटी २५ लाख रुपये आहे. पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेतले. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीमध्ये अन्य चार आरोपींची माहिती मिळाली असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!