#CRIME : लॉकरमध्ये दागिने ठेवत असाल तर ही बातमी वाचा; धक्का दिले आणि लॉकर उघडले, बँक ऑफ बडोदा मधून दीड कोटीचे दागिने गायब

817 0

लखनऊ : लखनऊ मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरात दागिने सुरक्षित रहात नाहीत म्हणून नागरिक बऱ्याच वेळा बँकेच्या लॉकरमध्ये दागिने ठेवत असतात. बँकेच्या लॉकरमध्ये दागिने सुरक्षित राहतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी पूर्ण नक्की वाचा.

उत्तर प्रदेश मधील कानपूर मधून किडवई नगरातील बँक ऑफ बडोदा मधून थोडे थोडे नाही तर तब्बल दीड कोटी रुपयांचे दागिने चोरण्यात आले आहेत. हे दागिने बिहारचे राहणारे सूर्यकुमार अवस्थी यांनी ठेवले होते. यावेळी अवस्थी यांची पत्नी रामा अवस्थी या दागिने घेण्यासाठी म्हणून आपल्या मुली सोबत बँकेत गेल्या होत्या.

लॉकर जवळ गेल्या असता समोर जे दिसले ते पाहून या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. या लॉकरला साधा हात लागला असता लॉकर आपोआप उघडलं गेलं आणि हे लॉकर त्यांनी तपासल्यानंतर त्यातून सगळे दागिने गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. या लॉकरमध्ये जवळपास दीड कोटी रुपयांचे दागिने होते. हे सर्व दागिने चोरी गेले होते. हे दागिने चोरण्यासाठी लॉकर कापण्यात आलं होतं. हे देखील पोलीस तपासात उघडकीस आलं आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लॉकरच्या जवळ आरोपींच्या हाताचे ठसे सापडतात का ? आणि इतर फॉरेन्सिक तपासणी केली असल्याचे सांगितलं. तांत्रिक तपास केला जातो आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!