Re-certification of autorickshaw meters : ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे आवाहन

392 0

पुणे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार १ सप्टेंबर २०२२  पासून भाडेवाढ लागू केली असल्याने ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑटोरिक्षांचे मीटर पुनःप्रमाणीकरण करावयाचे आहे.

ऑटोरिक्षांचे मीटर पुनःप्रमाणीकरण विहित कालमर्यादेत व सुरळीतपणे पूर्ण होण्याकरिता मीटर तपासणी ट्रॅकचे विकेंद्रीकरण करण्यात आलेले आहे. अलंकार पोलीस स्टेशनसमोर, कर्वेनगर, फुलेनगर आळंदी रस्ता चाचणी मैदान, रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, इगलबर्ग कंपनी  लेन नं.३, दिवे (पासिंग वाहने) आणि इऑन आयटी पार्कजवळ खराडी पोलीस चौकीसमोर खराडी या ट्रॅकवर तपासणी होणार आहे.

या सर्व ट्रॅकवर सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज करण्यात येणार आहे. सर्व संबंधित रिक्षाचालकांनी कॅलीब्रेशन पूर्ण झालेल्या ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी जवळच्या ट्रॅकवर सादर कराव्यात असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!