रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील 13 कोर्पोरेटिव बँकांना नियमांचं पालन न केल्याने 50 हजार रुपयांपासून 4 लाखांपर्यंतचा दंड ठोठावला आहे. यात महाराष्ट्रातील कुठल्या बँकांचा समावेश आहे पाहूया.
इंदूर प्रीमियर को-ऑपरेटिव्ह बँक, इंदूर दोन लाख रुपये दंड आणि द तुरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, मेघालय यांना वेगवेगळ्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल प्रत्येकी 1.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय अन्य काही बँकांनाही दंड ठोठावण्यात आला आहे.बँकांनी नियमांचं पालन केलेलं नसल्यामुळं हा दंड ठोठावण्यात आला असल्याचं RBI ने सांगितलं आहे. बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर या दंडात्मक कारवाईचा परिणाम होणार नाही. म्हणजेच, या कारवाईमुळे ग्राहकांना कोणताही आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाही. तसेच, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही.