ब्रेकिंग न्यूज ! पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल,काय आहे प्रकरण ?

671 0

पुणे- बेकायदेशीरपणे टेलिफोन टैपिंग केल्याप्रकरणी माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा न्यायालयात वाद सुरु असतानांच या कारवाईमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

बेकायदेशीर टेलिफोन टैपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीला २०१५ ते २०१९ या पाच वर्षात फोन टॅपिंग हे अनिष्ट राजकीय हेतूने लोकप्रतिनिधींचे फोन गैरपद्धतीने टॅप करण्यात आले आहेत किंवा कसे ? याचा तपास करण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यानुसार या समितीने पडताळणी केली. त्याची पडताळणीकरून समितीने शासनाला अहवाल सादर केला आहे. त्यात रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या काळात बेकायदेशीर अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केल्याचे नमूद केले आहे.

या समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या रश्मी शुक्ल या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. शासनाच्या आदेशानंतरच पुणे पोलिसांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलिसांकडून फोन टॅपिंग गुन्हा दाखल झाल्याच्या प्रकरणाची गुप्तता पाळण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!