Breaking News
mahaganapati

मंदिर प्रवेश बॅनरबाबत काय म्हणाले रांजणगाव गणपती देवस्थान?

1010 0

पुणे : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (Ranjangaon Ganpati) येथील श्री महागणपती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली. या आशयाचे बॅनर (Banner) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या सगळ्यावरून आता देवस्थान ट्रस्टने आपली भूमिका मांडली आहे.

या सगळ्याबद्दल देवस्थानच्या अध्यक्ष स्वाती पाचुंदकर (Swati Pachundkar, president of the temple)यांनी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या अशा प्रकारचा कोणताही निर्णय देवस्थानने घेतलेला नाही. शिवाय देवस्थानच्या वतीने कुठेही अशा आशयाचे फलक अधिकृतरीत्या लावण्यात आलेले नाही. तसेच देवस्थानच्या अधिकृत संकेस्थळावरसुद्धा अशा प्रकारची कुठलीच पोस्ट नाही आहे.

काही दिवसांपूर्वी तुळजापूर (Tuljapur) या ठिकाणी अशा आशयाचे बॅनर प्रसिद्ध करत तोकडे कपडे घालण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले होते. मात्र समाज माध्यमांवर यावरून टीका झाली. आणि यावर तुळजापूर देवस्थानने असा कुठला निर्णय घेतलाच नसल्याचे समोर आले. असे कुठलेही बॅनर लावण्याचे आदेश मंदिर प्रशासनाने दिले नाहीत किंवा तसा ठराव देखील झालेला नाही, असे तुळजाभवानी संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे (Collector Dr. Sachin Ombase) यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अष्टविनायक पैकी एक असलेले हे एक तीर्थ क्षेत्र आहे. या ठिकाणी राज्यासह देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. रांजणगाव गणपतीचे महागणपती असे नाव आहे. त्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. दर शनिवार, रविवार आणि चतुर्थीच्या दिवशी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. काही दिवसांपूर्वी त्रंबकेश्वर मंदिर वाद, तुळजापूर मंदिर वाद यावरून रांजणगाव देवस्थानने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Share This News
error: Content is protected !!