राजेश पाटलांची उचलबांगडी ! शेखर सिंह हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवे आयुक्त ( VIDEO )

373 0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली असून आता त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आलीये. राज्य सरकारचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी हा आदेश पारित केला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात श्रावण हर्डीकर यांच्या जागी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिवाय पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली होती . मात्र मविआ सरकारच्या काळातच कृष्ण प्रकाश यांची बदली करण्यात आली.

आता राज्यात शिंदे -फडणवीस सरकार आल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची बदली करण्यात येऊन त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!