राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना पुन्हा अपघात, १२ गाड्यांचे नुकसान

453 0

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्याच्या सभेसाठी औरंगाबाद येथे दाखल झाले आहेत. औरंगाबादच्या दिशेने येत असताना राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा पुन्हा एकदा अपघात झाला आहे. यामध्ये १२ गाड्यांचे नुकसान झाले आहे. नगर जिल्ह्यातील घोडेगाव येथे आज दुपारी असाच अपघात घडला होता. त्यामध्ये दोन गाड्यांचे नुकसान झाले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा दुसरा अपघात घडला आहे. औरंगाबाद जवळील वाळूज येथे हा अपघात घडल्याची माहिती आहे. या अपघातात १२ गाड्यांच नुकसान झालं आहे. यामध्ये पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची गाडी देखील असल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी आज दुपारी अहमदनगर येथील घोडेगाव येथे तीन गाड्या एकमेकांना पाठीमागून धडकल्या होत्या ज्यात केदार शिंदे आणि अंकुश चौधरी यांच्या गाडीचे नुकसान झाले होते. या दोन्ही अपघातात कुणी जखमी झाले नाही. वाळूज येथे घडलेल्या अपघातात एअर बॅग्समुळे कुणालाही दुखापत झाली नाही असं सांगण्यात आलं आहे.

Share This News

Related Post

शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना नारळ; खासदार गजानन कीर्तिकर यांची नव्याने नियुक्ती, वाचा सविस्तर

Posted by - March 23, 2023 0
मुंबई : निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर सर्व महत्त्वाच्या पदावरून…

आनंद महिंद्रांनी केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक

Posted by - April 17, 2022 0
वेगवेगळ्या कल्पनाशक्तींचे कौतुक करणारे उद्योगपती म्हणून महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांची ओळख सर्वश्रुत आहे. उद्योग-व्यवसाय वाढवण्याच्या अनोख्या, डोकेबाज कल्पनांचं…

हिम्मत असेल तर रिसॉर्ट पाडून दाखवा, अनिल परब यांचे किरीट सोमय्यांना आव्हान

Posted by - March 26, 2022 0
मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपुर्वी ‘चला अनिल परब यांचे रिसोर्ट तोडुया’ असे ट्विट केले होते. आता दापोलीतील…
Maharashtra Political Crisis

Loksabha : लोकसभेच्या निकालानंतर महायुतीची ठरणार रणनिती; ‘या’ गोष्टीवरून होणार जागावाटप

Posted by - May 28, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha) सातवा आणि शेवटचा टप्पा बाकी आहे. 1 तारखेला शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असून 4 तारखेला…
Solapur Accident

Soalpur Accident: बाळूमामांच्या दर्शनाहून परतताना दुर्दैवी अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

Posted by - June 19, 2023 0
सोलापूर : राज्यात अपघाताचे (Soalpur Accident) प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. सांगोला तालुक्यातील आदमापूर येथील मंदिरातून बाळूमामांचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *