महत्वाची बातमी ! मुंबईतील 72 % मशिदींनी स्वतःहून बंद केले भोंगे

250 0

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले. विरोधी पक्षांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केलेली असतानाच मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील 72 % मशिदींवरील पहाटेचा भोंगा बंद झाला आहे. मशिदींनी स्वतःहून भोंगे बंद केल्याची पोलिस सूत्रांची माहिती आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लाऊडस्पीकर काढणे हे मुंबई पोलिसांचे काम नसून सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन होत असेल, तर त्यावर तातडीने कारवाई केली जाईल. निवासी भागात 55 डेसिबल, तर व्यावसायिक क्षेत्रात 65 डेसिबल आवाजाची मर्यादा आहे.’

राज ठाकरे यांनी भोंगे हटवले नाहीत तर हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार असं स्पष्ट केलं आहे. या घोषणेनंतर मुंबईतील 72 % मशिदींवरील पहाटेचा भोंगा बंद झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!