महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर राज ठाकरेंचं पत्र ! “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा”, राज ठाकरेंनी कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा घेतला खरपूस समाचार

323 0

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या ठाकरे शैलीमध्ये खळखट्याक करणारे पत्र महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा खरपूस समाचार घेतला आहेच. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी महाराष्ट्र भूमीकडे येणारी बोट पिरगळली जातील हे बघावं. असं देखील सुनावलं आहे.

त्यासह इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून महाराष्ट्राचे आहोत हे स्मरण कृती व्हावी अशी अपेक्षा… केंद्र सरकारनेही या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि वाद चिघळणार नाही हे पाहावं अशी भूमिका मांडली आहे.

Share This News
error: Content is protected !!