“देशाची लूट करणाऱ्यांविरोधात आवाज उठवला म्हणून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द…!” ; काँग्रेस नेते आक्रमक

678 0

नवी दिल्ली : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणं हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीविरोधी आहे. देशाची लूट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आवाज उठवला म्हणून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली, अशा शब्दात काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वी आमच्या खासदारची खासदारकी रद्द करण्यात आली. आता राहुल गांधी यांची देखील खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकशाहीला धक्का देणारा निर्णय आज घेण्यात आला. आम्ही त्याचा निषेध करत आहोत.

नाना पाटोळे म्हणाले कि , राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. हा निर्णय लोकशाही विरोधी आहे. नरेंद्र मोदी यांचं सरकार केवळ मोदींसाठी काम करत आहे. राहुल गांधी सरकारविरोधात आवाज उठवत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल करुन गुजरातमधील एका न्यायालयातून निर्णय घेत त्यांची खासदारकी रद्द केली आहे.

बाळासाहेब थोरात म्हणाले कि, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणं हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली. संपूर्ण देशात पायी चालून जनतेची मनं जोडण्याचं काम केलं. केंद्र सरकार, मोदी आणि अदानींचे संबंधावर उत्तर मागितलं. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. राहुल गांधी यांच्या दडपशाहीला घाबरणार नाही.

 

 

Share This News
error: Content is protected !!