राधाकृष्ण विखे पाटील यांचे हेलिकॉप्टर या कारणामुळे उड्डाण घेईना

892 0

सांगोला येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर हेलिकॉप्टर मध्ये बसले पण पायलटने अनेक प्रयत्न करून देखील हेलिकॉप्टर उड्डाण घेत नव्हते.

साहित्य संमेलनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर त्यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांच्या निवासस्थानी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते विरोधी पक्षाच्या नेते मंडळीची निवेदने स्वीकारली. भोजनानंतर ते परत मुंबईला जाण्यासाठी सांगोला महाविद्यालयाच्या हेलीपॅडवर आले.

हेलिकॉप्टरमध्ये पायलट, को पायलट, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ,खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर अंगरक्षक यांच्यासह ८ लोक बसले होते. पण काही केल्या हेलिकॉप्टर जमीन सोडायला तयार नव्हते. पायलटने खूप वेळ प्रयत्न केला. अखेर हेलिकॉप्टर मधून महिला अधिकारी उतरल्या आणि हेलिकॉप्टरने दुपारी ३ च्या सुमारास आकाशात उड्डाण घेतले. क्षमतेपेक्षा अधिक लोक बसल्यामुळे हेलिकॉप्टर उड्डाण घेत नव्हते अशी माहिती समोर आली. हा प्रकार आज शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडला.

Share This News
error: Content is protected !!