सोलापुरात गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा; सदावर्ते यांच्या अंगावर फेकली काळी शाई; वाचा सविस्तर प्रकरण

297 0

सोलापूर : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला आहे. गुणरत्न सदावर्ते हे राज्यातील विविध भागात जाऊन ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासह कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. सोलापूरमधील पत्रकारपरिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सदावर्ते बोलत असतांना संभाजी ब्रिगेडच्या वतिने काळी शाई फेकण्यात आली आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेतच मोठा राडा झाल्याचे बघायला मिळाले आहे.

त्याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांना विरोध देखील होत आहे. उस्मानाबाद येथेही सदावर्ते यांना विरोध झालेला होता. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते हे सोलापूर दौऱ्यावर होते. पत्रकार परिषद सुरू असतांना सदावर्ते यांच्या अंगावर काळी शाई फेकण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!