पुष्कर सिंह धामी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

147 0

उत्तराखंड- उत्तराखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजप) विजय मिळवून देणारे पुष्कर सिंह धामी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक केंद्रीय नेते उपस्थित होते. उत्तर प्रदेशचे काळजीवाहू मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

राज्यातील समज मोडीत काढत जनतेने भाजपला ऐतिहासिक जनादेश दिला आहे, त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी कार्यक्रमही ऐतिहासिक, भव्य आणि दिव्य होता, त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये, भाजपने 70 पैकी 47 जागा जिंकल्या आणि सलग दुसऱ्यांदा दोन तृतीयांश बहुमताने सत्तेत आला.

धामी हे सलग दोन वेळा मुख्यमंत्री होणारे राज्यातील पहिले नेते ठरले आहेत. त्यांच्यासह आठ मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. पुष्कर सिंह धामी खतिमा विधानसभेतून निवडणूक हरले होते, पण पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड झाली. पक्षातील जबाबदार आणि बड्या नेत्यांमध्ये धामी यांचे नाव येते.

Share This News
error: Content is protected !!