पुण्याचा अभिजीत कटके हिंदकेसरी ! हरियाणाच्या सोनूवीरला अस्मान दाखवत महाराष्ट्राच्या पठ्ठयानं मारलं मैदान !

3092 0

पुणे : भारतीय कुस्तीत सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा किताब पुण्याचा पहिलवान अभिजीत कटके यानं पटकावला. हरियाणाच्या सोनूवीरवर ५-० अशी एकतर्फी मात करत या पठ्ठ्यानं मैदान मारलं.

अभिजीत कटके ठरला 42वा महाराष्ट्र केसरी

भारतीय शैली कुस्ती महासंघाकडून 5 ते 8 जानेवारी या कालावधीत हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय 51 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कुस्ती स्पर्धेत अभिजीत कटके यानं हिंदकेसरीचा किताब जिंकत मानाची गदा पटकावली. या स्पर्धेत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी देखील सहभागी झाला होता परंतु उपांत्य फेरीत त्याचा पराभव झाल्यानं महाराष्ट्राची सारी मदार अभिजीतवर होती.

हरयाणाच्या मल्लांचं कुस्तीतलं वर्चस्व पाहता हिंदकेसरीची गदा हरियाणाकडं जाते की काय अशी शंका वर्तवली जात असताना अभिजीतनं सर्व अंदाज चुकीचे ठरवत अंतिम सामन्यात हरियाणाच्या सोनूवीरचा पराभव करत तो हिंदकेसरी ठरला.

अभिजीत कटके ठरला महाराष्ट्र केसरी, पटकावली चांदीची मानाची गदा ...

हिंद केसरीची मानाची गदा पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा हवेली तालुक्याचा ढाण्या वाघ आणि वाघोली गावचा सुपुत्र पहिलवान अभिजीत कटके याच्या विजयानंतर महाराष्ट्रासह पुण्यात एकच जल्लोष झाला !

Share This News
error: Content is protected !!