पुणेरी पाटी : विषाची परीक्षा घेऊ नका! जो पुरुष येथे कचरा टाकेल त्याची बायको लवकर…

1290 0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात सध्या एका फलकाची जोरदार चर्चा सुरूय. वारंवार सांगून देखील कचरा टाकला जात असल्यानं वैतागून जाऊन सामाजिक कार्यकर्ते संजय गायखे यांनी एक फलक लावलाय. काय लिहिलंय या फलकावर पाहूयात…

हा पाहा, हाच तो फलक! आता या फलकवरील मजकूर पाहा… ‘विषाची परीक्षा घेऊ नका. जो पुरुष येथे कचरा टाकेल त्याची बायको लवकर मरेल, जी महिला येथे कचरा टाकेल तिचा नवरा लवकर मरेल, जे तरुण-तरुणी येथे कचरा टाकतील त्यांची लग्नं होणार नाहीत, जे शाळकरी मुलं-मुली येथे कचरा टाकतील ते कधीच पास होणार नाहीत सतत नापास होतील,’ असं या फलकावर लिहिण्यात आलंय. फलकाच्या शेवटी चुकीला माफी नाही, असं ठळक अक्षरात लिहिण्यात आलंय. त्यामुळं आता कचरा टाकणारे हे कितपत मनावर घेणार की हे असलं वाचूनही कचरा टाकणार हे पाहाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!