पुणे : 31 डिसेंबरसाठी पुणेकर जंगी प्लॅन करत आहेत. मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर पडतात, खानपान आणि मद्यप्राशन करून जर तुम्ही 31 डिसेंबर साजरा करण्याचा प्लॅन करत आहात तर आधी तुमच्याकडे मद्यप्राशन करण्याचा परवाना आहे का? हे तपासून घ्या. कारण 31 डिसेंबरला राज्य उत्पादन शुल्काची 10 विशेष पथक पुण्यात करडी नजर ठेवणार आहेत.
रात्रीची गस्त, अनधिकृत ढाबे, फार्म हाऊस तसेच गाड्यांची तपासणी होणार असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरण सिंह रजपूत यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यामध्ये अनधिकृत मद्य विक्री संदर्भात 240 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 17 वाहन जप्त करण्यात आली असून, पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील १ लाख 65 हजार नागरिकांना मद्य प्राशन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वन-डे परमिट दिल आहे. हे परवाने हॉटेल बार यांच्याकडे देण्यात आले आहेत. वन डे परमिटची किंमत पाच रुपये आहे.