पुणे : औंध, पाषाण, बाणेर परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद

420 0

पुणे : चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागांतर्गत चतु:शृंगी टाकीच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी औंध, बाणेरसह इतर काही भागाचा पाणीपुरवठा या दिवशी बंद राहणार आहे.

सकाळनगर, औंध रस्ता, आयटीआय रस्ता, औंध गाव आणि बाणेर रस्ता, पंचवटी, पाषाण, निम्हण मळाभाग, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाणचा काही भाग, चव्हाणनगर, पोलीस वसाहत, अभिमान श्री सोसायटी, राजभवन, भोसलेनगर, पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंतचा परिसर, रोहन निलय, औंध उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेज परिसर, आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्ती पर्यंतचा भाग, बाणेर, बोपोडी, इंदिरा वसाहत या भागातील पाणीपुरवठा 4 जानेवारीला बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असं महापालिका पाणीपुरवठा विभागाने सांगितलं आहे. नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!