पुणेकरांसाठी महत्त्वाचे! आता वाहतूक पोलीस दंड आकारणार नाहीत

444 0

पुणे- वाहन चालवताना नियम मोडला की वाहतुक पोलीस लगेच दंड ठोठावतात. यामुळं कधी-कधी वाहतूक पोलीस आणि वाहनचालक यांच्यात वादावादी देखील होते.

यावर पुणे पोलिसांनी नामी उपाय शोधला पुणे वाहतुक पोलीस आता थेट दंड आकारणार नाहीत.

पुणेकरांना आता सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे जर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत तुमची चुक पकडली गेली. तर तुम्हाला थेट ऑनलाईन दंडच भरावा लागणार आहे.

वाहतुकीचा नियम मोडला तर दंडाच्या नावाखाली वाहतूक पोलीस बेकायदेशीर पद्धतीने पैसे घेतात. ज्याची कोणतीही नोंद, पावती, पुरावा मिळत नाही. पुणेकरांनी अशी लेखी तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुणे पोलीस आयुत्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली होती. या तक्रारींची तातडीने दखल घेत पुणे पोलिसांनी पावले टाकली आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेत आदेश दिले आहेत. या आदेशानुसार पुढील आदेश येईपर्यंत पुणे वाहतूक पोलिसांना दंड आकारता येणार नाही.

Share This News
error: Content is protected !!