पुणे- बाहेरगावावरून पतीसोबत कामाच्या शोधासाठी पुण्यात आलेल्या एका महिलेवर दोन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी एका ट्रॅव्हल्स चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
नवनाथ शिवाजी भोंग (38) असे अटक केलेल्या ट्रॅव्हल्स बस चालकाचे नाव आहे. याबाबत 21 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामाच्या शोधात पीडित महिला तिच्या पतीसोबत मध्यरात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वाशिमवरून पुण्यात आली होती. हे दोघेही खोलीच्या शोधात होते. पण तोपर्यंत स्वारगेट स्टँडवरच झोपू असा विचार त्यांनी केला. त्यावेळी आरोपी नवनाथ भोंग याने ट्रॅव्हल्स बसमध्येच झोपण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेऊन हे दाम्पत्य बसमध्येच झोपण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळाने महिलेचे पती वॉशरूमला गेला. .
ते पाहून आरोपीने काही क्षणात बस तेथून पळवून नेली. महिलेने आरडाओरड केली पण त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. स्वारगेटजवळ असलेल्या फुटपाथच्या बाजूला बस थांबून तिच्यावर बलात्कार केला.त्यानंतर पुन्हा कात्रज बस स्टॉप जवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबून पुन्हा तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. त्यानंतर बसमधून पीडित महिलेस खाली उतरवले आणि आरोपी तेथून पसार झाला. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यास पोलिसांनी आरोपीला पकडलं असून पुढील तपास सुरू आहे.