पुण्यात विकृतीचा कळस : प्रमोशनसाठी बॉस सोबत संबंध ठेवायला सांगत होता पती; सासू, दीर आणि पतीच्या विरुद्ध गुन्हा दाखल

22367 0

पुणे : एक गंभीर प्रकरण पुण्यातून उघडकीस येत आहे. एका 42 वर्षे महिलेने आपल्या पती आणि सासरकडच्यांविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. प्रमोशन मिळावे यासाठी पतीने बॉस सोबत संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप या महिलेने केला.

मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, या 42 वर्षीय महिलेचे 2003 मध्ये नंदनगर येथील अमित छाब्रा याच्यासोबत विवाह झाला होता. या दोघांना एक बारा वर्षाची मुलगी आहे. अमित छाब्रा हा एका कपड्यांच्या शोरूम मध्ये विक्रीचे काम करत असून त्याला दहा हजार रुपये महिना मिळतो. प्रमोशन मिळावे आणि पगार वाढ व्हावी यासाठी त्याने स्वतःच्याच पत्नीला बॉस सोबत संबंध ठेवण्यासाठी सांगितलं.

पतीच्या या मागणीने त्याच्या पत्नीला जबर मानसिक धक्का बसला. यासाठी तिने नकार दिल्यानंतर पतीकडून तिला मारहाण देखील करण्यात आली. पण आपल्या बारा वर्षाच्या मुलीकडे पाहून आणि संसार तुटू नये यासाठी तिने निमूटपणे सहन केलं. पण त्यानंतर तिच्या दिराकडून देखील तिच्याशी असभ्यवर्तन सुरू झालं. या सगळ्याची तक्रार तिने सासूकडे केली, पण सासूने देखील कोणताही हस्तक्षेप न करता पुन्हा तिलाच मारहाण केली.

दरम्यान हा प्रकार सहन न झाल्याने तिने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला. हाताची नस कापून घेतल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू असे पर्यंत सासरकडच्यांनी मौन बाळगले. पण पुन्हा अत्याचार सुरूच झाले. अखेर महिलेने 12 ऑगस्ट 2022 रोजी पुणे सोडून इंदोरला निघून गेली. इंदोरला पुन्हा पतीने येऊन तिला सर्वांसमोर मारहाण केल्याची तक्रार देखील तिने केली आहे.

यानंतर महिलेने केलेल्या तक्रारीनुसार न्यायालयाने महिला व बालकल्याण विभागाला समन्स बजावले न्यायालयाच्या आदेशानंतर महिला व बालविकास विभागाच्या पथकाने पीडितेशी संवाद साधला असता तसेच शहानिशा केल्यानंतर तिने केलेले लैंगिक अत्याचाराचे आरोप खरे असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने पीडितेचा पती अमित छाबरा, दीर राज आणि सासू हेमलता यांच्याविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

Share This News
error: Content is protected !!