धक्कादायक ! एकतर्फी प्रेमभंगातून तरूणीच्या 7 वर्षीय भावाचं अपहरण करून खून VIDEO

678 0

पिंपरी-चिंचवड : प्रेमभंगाचा राग अनावर झालेल्या तरुणाने प्रेयसीच्या भावाचे अपहरण करून खून केल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. २० कोटींची खंडणी मागून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र आता खरं कारण समोर आलं आहे.

आदित्य आगले (वय सात वर्षे) असं खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी मंथन किरण भोसले आणि अनिकेत समदूर यांना अटक करण्यात आली आहे. आदित्यचा मृतदेह रात्री भोसरी MIDC परिसरात आढळून आला. गुरुवार पासून आदित्य बेपत्ता होता. त्याचा शोध कुटुंबीय घेत होते. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी मंथन भोसले हा मृत आदित्यच्या सोसायटीत वास्तव्यास होता.

आदित्यच्या बहिणीवर मंथनच एकतर्फी प्रेम असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रेमाला घरातूनच विरोध होता. यावरून भांडण देखील झाले. या सर्व घटनेमुळं मंथनच्या डोक्यावर परिणाम झाला आणि दोन वर्षे शिक्षणापासून वंचित राहिला. नको त्या गोष्टी करायला लागला. आगले कुटुंबाला अद्दल घडवायची या उद्देशाने मंथनने आदित्यच अपहरण करायचे ठरवले. त्याने मित्राच्या मदतीने कट रचला. अपहरण करण्यासाठी चारचाकी गाडीला काळी फिल्म लावण्यात आली.

गुरुवारी संध्याकाळी आदित्य सोसायटीच्या खाली खेळण्यास आला तेव्हा मित्राला त्याला गाडी जवळ बोलावण्यास सांगितले. आदित्य गाडी जवळ येताच त्याला गाडीत घेऊन त्याचं नाक आणि तोंड दाबून त्याला जागीच ठार केलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी आदित्यच्या कुटुंबीयांच्या व्हाट्सएपवर २० कोटींची खंडणी मागण्यात आली. परंतु, अवघ्या काही तासातच आरोपीपर्यंत पोचत गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने आरोपींना बेड्या ठोकल्या.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!