TUSHAR HAMBIRARO

PUNE POLICE : तुषार हंबीरराव हल्ला प्रकरणातील ‘ते’ तीन पोलीस शिपाई निलंबित

521 0

पुणे : खून या सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी तुषार हंबीर हा येरवडा कारागृहामध्ये होता. त्याच्यावर वैद्यकीय उपचारासाठी त्याला 28 ऑगस्ट पासून ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान पाच सप्टेंबरला तुषार हंबीरराव यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी आठ आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

तसेच या प्रकरणातील तीन पोलीस शिपाई यांना देखील निलंबित करण्यात आल आहे. तुषार हंबीररावच्या बंदोबस्तासाठी ससून रुग्णालयामध्ये पोलीस शिपाई पांडुरंग कदम ,राहुल माळी आणि सिताराम कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु हे पोलीस शिपाई गैरहजर असल्याचा मोठा खुलासा झाल्यानंतर हलगर्जीपणाचा ठपका ठेवून या तीन पोलीस शिपायांना पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी निलंबित केला आहे.

पाच सप्टेंबरला हिंदुराष्ट्र संघटनेचा अध्यक्ष असलेला तुषार हंबीरराव यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. तर यापूर्वी देखील येरवडा कारागृहामध्ये देखील त्याच्यावर हल्ला झाला होता.

Share This News
error: Content is protected !!