पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील रेकॉर्डवरील आरोपी इस्माईल मौलाली मकानदार आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. इस्माईल मौलाली मकानदार हा चुहा गॅंग टोळीचा प्रमुख आहे.
आपली दहशत कायम राहावी यासाठी या टोळीने आज तागायात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत. यामध्ये खुनाचा प्रयत्न खंडणी बेकायदेशीर रित्या हत्यार जवळ बाळगणे ,बेकायदेशीर जमाव जमावणे ,दहशत माजवणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
शहरातील अस्तित्वात असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी ठोस कारवाई करण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार या गुन्हेगारी टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.