#PUNE : माजी नगरसेविकेच्या कारला पीएमपीची धडक; ‘नुकसान भरपाई देतो..!’ सांगूनही बस चालकाला नगरसेविकेच्या पतीची जबर मारहाण

809 0

पुणे : पुण्यात काल एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील एका माजी नगरसेविकेच्या पतीने पीएमपी बस चालकाला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली. तर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ देखील करण्यात आली.

या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. दरम्यान भाजपच्या माजी नगरसेविका प्रतिभा ढमाले यांची ही गाडी असून त्यांचेच पती नितीन ढमाले आणि त्यांच्यातील साथीदारांनी बस चालक शशांक देशमाने यांना जबर मारहाण केली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मार्ग क्रमांक दोन स्वारगेट ते शिवाजीनगर या भागामध्ये काम करत असताना अभिनव कॉलेज चौकात पीएमपी बसचा यांच्या कारला धक्का लागला होता. किरकोळ अपघातानंतर ह वाद एवढा वाढला की, थेट प्रतिभा ढमाले यांचे पती आणि त्यांच्या तीन साथीदारांनी या बस चालकाला दगडाने मारहाण केली आहे. या मारहाणीमध्ये देशमाने यांच्या डोक्याला देखील गंभीर दुखापत झाल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे.

टॉप न्यूजला मिळालेल्या या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट पाहू शकतो की, देशमाने यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत होऊन ते रक्तबंबाळ झाले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, नुकसान भरपाई भरून देतो असं म्हणत असताना देखील या पीएमपी बस चालकाला मोठ्या प्रमाणावर मारहाण करण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय.

Share This News
error: Content is protected !!