पुणे नवरात्रौ महिला महोत्सव : 28 सप्टेंबर रोजी महिला महोत्सवाचे होणार शानदार उदघाटन ; तेजस्विनी पुरस्कार प्रदान सोहळा ठरणार खास आकर्षण

273 0

पुणे : महिलांच्या कला गुणांना वाव देणारा पुणे नवरात्रौ महिला महोत्सव यंदा २२ वे वर्ष साजरे करत आहे. यंदा हा महिला महोत्सव दि. २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत होत असून याचे उदघाटन बुधवार दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी १.०० वा. श्री लक्ष्मी माता मंदीर प्रांगण, मुक्तांगण शाळेजवळ, शिवदर्शन, पुणे येथे संपन्न होत आहे. ज्येष्ठ नाट्य व चित्रपट अभिनेत्री सुहासिनी देशपांडे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सँडी ग्रुप तर्फे सर्व प्रथम गणेश वंदना व देवीचा गोंधळ सादर केला जाईल.

दरवर्षी विविध क्षेत्रातील ज्येष्ठ व तरूण कर्तबगार महिलांना या महिला महोत्सवात उदघाटन प्रसंगी तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरविले जाते. ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे, मॉडेलिंग ग्रुमिंगतज्ञ जुई सुहास आणि सह्याद्री क्रांती मळेगावकर यांना पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचा मानाचा ‘तेजस्विनी‘ पुरस्कार या उद्घाटन सोहळ्यात देऊन गौरविले जाणार आहे.

५००० /- रु. रोख, देवीची प्रतिमा, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे, अशी माहिती पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री आबा बागूल यांनी दिली. पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या उद्घाटन तेजस्वी पुरस्कार विरतरण कार्यक्रमानंतर तेथेच भाग्यलक्ष्मी स्पर्धा अंतर्गत होम मिनिस्टर हा स्पर्धा कार्यक्रम संपन्न होईल.

Share This News
error: Content is protected !!