पुणे : फुरसुंगीतील किराणा मालाच्या दुकानाला भीषण आग; आगीवर नियंञण मिळवण्यात यश

294 0

पुणे – आज दिनांक ३०•११•२०२२ रोजी पहाटे ०४•४४ वाजता फुरसुंगी, हरपळे वस्ती, तारांगणा सोसायटी येथे एका दुकानाला आग लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन दलाकडून हडपसर व काळेबोराटे नगर अग्निशमन केंद्र येथून ०२ फायरगाड्या रवाना करण्यात आल्या. 

घटनास्थळी पोहोचताच सात मजली इमारतीत तळमजल्यावरील एक किराणा मालाचे दुकान मोठ्या प्रमाणात पेटल्याचे जवानांच्या निदर्शनास येताच त्यांनी होज पाईपच्या साह्याने आगीवर पाण्याचा मारा करत दुकानात कोणी अडकले नसल्याची खाञी करून २० मिनिटात आगीवर नियंञण मिळवत पुढील काही वेळातच आग इतरञ पसरु न देता पुर्ण विझवली व जवानांनी पुढील धोका टाळला. किराणा मालाचे दुकान बंद असल्याने आतमधे कोणी ही व्यक्ती नसून जखमी वा जिवितहानी झाली नाही. आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. सदरील किराणा माल दुकानाचे नाव हे रामदेव सुपर मार्केट (१०×२० आरसीसी बांधकाम) असे असून आगीमधे संपुर्ण किराणा माल तसेच फर्निचर व फ्रिज जळाले आहे.

या कामगिरीत हडपसर अग्निशमन केंद्र अधिकारी प्रमोद सोनावणे व वाहनचालक नारायण जगताप, अमित सरोदे व जवान दत्तात्रय चौधरी, महेंद्र कुलाळ, चंद्रकांत नवले, सुरज यादव, नितेश डगळे यांनी सहभाग घेतला.

Share This News
error: Content is protected !!