पुणे : लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई : पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील पोलीस कार्मचा-यासह १ जण जाळ्यात, वाचा सविस्तर

196 0

पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करून मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलीस कर्मचाऱ्यासह एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्याने तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. यापैकी 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सापळा रचून लासलुचपत विभागान पोलीस कर्मचाऱ्यासह एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणांमध्ये पोलीस शिपाई दीपक क्षीरसागर वय वर्ष 34 गुन्हे शाखा युनिट तीन आणि सिमोन साळवी वय वर्ष 27 अशी अटक केलेल्यांची नावे आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!