पुणे हादरले ! चाकूचा धाक दाखवून अपहरण.. बलात्कार..नग्न अवस्थेत फोटो आणि मग फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ६ मित्रांसोबत सामूहिक बलात्कार

883 0

पुणे : पुण्यामध्ये पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढण्यात आले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याचे धमकी देऊन तिच्यावर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, या सहा जणांनी जबरदस्तीने पळून नेलं त्यानंतर तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करून देऊ असे धमकी देऊन तिच्यावर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. याप्रकरणी ओम राजू तांबोळे, जय राजू तांबोळे, अनिल जाधव, सुनील जाधव, शुभम जावळे, किरण जावळे या सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल जाधव याने चाकूचा धाक दाखवून या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला अनिल जाधव यांनीच तिचे नग्न अवस्थेतील फोटो काढून मित्रांमध्ये व्हायरल केले. त्यानंतर तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. 23 डिसेंबरला या सहा आरोपींनी तिला बोलावून घेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. या आरोपींच्या विरुद्ध पॉस्कोसह अनुसूचित जाती जमाती अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!