पुणे : राज्यपालांचे फेडले धोतर; जाळली काळी टोपी; छत्रपती शिवाजी महाराजांबाबत संतापजनक वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे डमी राज्यपालांचे धोतर फेडून अनोखे आंदोलन

382 0

पुणे : सध्या राज्यभरामध्ये राहुल गांधी यांनी सावरकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापलेले असताना, त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करून एका नवीन वादाला तोंड फोडल आहे. “शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जेसे आदर्श हे” असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केलं. राज्यपालांच्या या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत असताना, पुण्यामध्ये राष्ट्रवादीने राज्यपालांच्या डमीचे धोतर फेडून आणि काळी टोपी जाळून त्यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला आहे.

आज पुण्यामध्ये स्वारगेट येथील सावरकर पुतळ्याजवळ राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्या डमीचे धोतर फेडून, तसेच त्यांची काळी टोपी जाळण्यात आली. त्यासह उठाबशा देखील काढायला लावून हे अनोखा आंदोलन करण्यात आल आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्हाला सांगायचे आहे की, हा महाराष्ट्र कालही छत्रपतींचा होता, आजही छत्रपतींचा आहे, आणि उद्याही छत्रपतींचाच राहील. मात्र भाजपची लाचारी पत्करलेल्या मुख्यमंत्र्यांना सावरकरांचा अपमान दिसतो. पण छत्रपतींच्या अपमानावर ते सोयीस्कर मौन बाळगून आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

तसेच राज्यपालांची जर पुढच्या दोन दिवसात बदली केली नाही, तर महाराष्ट्रातील शिवप्रेमी राज्यपाल जिथे दिसतील तिथे त्यांचं धोतर फेडतील. आणि याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची राहील असा इशारा देखील यावेळी प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!