Breaking News

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा विश्व हिंदू मराठा संघाचे कार्यकर्ते ताब्यात VIDEO

276 0

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या अवमानकारक विधानाच्या निषेधार्थ पुण्यात आज सकाळी विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. चतु:शृंगी मंदिरापासून राजभवनापर्यंत ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येणार होती मात्र त्या आधीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.

तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं की तुमचा आयकॉन कोण ? तुमचा आवडता नेता कोण ? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळतील, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. राज्यपालांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येतोय.

राज्यपालांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीनं आज राज्यपाल कोश्यारी यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. पुण्यातील चतु:शृंगी मंदिरापासून राजभवनापर्यंत ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात येणार होती मात्र त्या आधीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नव्हती मात्र तरीही हे आंदोलन करण्यात आलं.

Share This News
error: Content is protected !!