#PUNE : भेकराईनगरमध्ये इमारतीतील पाचव्या मजल्यावर आगीची घटना; PHOTO

639 0

पुणे : पीएमटी बस स्टॉप डेपो भेकराईनगरच्या बाजूला रोहित रेसिडेन्सी येथे पाचव्या मजल्यावरील बंद फ्लॅटमधून धूर येतो अशी वर्दी मध्यवर्ती अग्निशमन केंद्र येथून सकाळी 10 वाजता मिळाली होती. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोचले असता पाचव्या मोजल्यावरील फ्लॅटमधून मोठ्या प्रमाणात धूर येत होता. दलाच्या मदतीने फ्लॅटमध्ये प्रवेश करून घरातील खिडक्यांच्या काचा फोडून व्हेंटिलेशन करून हि आग पूर्ण विझवण्यात आली.

सदरच्या आगीमध्ये बेडरूम मधील सर्व वस्तू कपाटातील सर्व कपडे व महत्त्वाची कागदपत्रे जळाली आहेत. तसेच किचन मधील सर्व गृहपयोगी वस्तू खराब झालेल्या आहेत. तसेच फ्लॅट मधील वायरिंग रंग फ्रिज सिलिंग इत्यादी जळाले आहे. सदरच्या कामगिरीमध्ये तांडेल तानाजी आंबेकर ड्रायव्हर राजू शेख फायरमन संदिप जगताप राजू टिळेकर मदतनीस कराडे गाडगे कारंडे यांनी अथक प्रयत्न करून सदरची आग विझवली.

Share This News
error: Content is protected !!