#PUNE FIRE : भवानी पेठ येथे वखार आणि गॅरेजमध्ये आगीची घटना

528 0

पुणे : आज दिनांक २३\०२\२०२३ रोजी दुपारी ११•०२ वाजता ७९७ भवानी पेठ, निशात टॉकीज जवळ आग लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन मुख्यालयातून दोन अग्निशमन वाहन व एक वाॅटर टँकर रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी मोकळ्या मैदानात अंदाजे ३००० स्के.फुट जागेत लाकडाची वखार व गॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे निदर्शनास आले असता जवानांनी तातडीने आगीवर पाण्याचा मारा सुरु करत जवळपास पंधरा मिनिटात आगीवर नियंञण मिळवले आणि कुलिंग करीत किमान तीस ते पस्तीस मिनिटात आग पुर्ण विझवली. आगीचे स्वरुप पाहता दलाची कसबा व गंगाधाम अग्निशमन वाहन ही अतिरिक्त मदत मागवण्यात आली होती. सदर ठिकाणी कोणी जखमी नसून आगीचे कारण समजू शकले नाही.

आगीमधे पञ्याच्या शेडमधे ठेवण्यात आलेले लाकूड सामान, फर्निचर व दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे.

सदर कामगिरीत अग्निशमन अधिकारी गजानन पाथ्रुडकर, प्रदिप खेडेकर तसेच वाहन चालक अतुल मोहिते, केतन साठे, संदिप थोरात, प्रशांत मखरे व तांडेल मंगेश मिळवणे आणि जवान चंद्रकांत गावडे, चंद्रकांत आनंदास, दिगंबर बांदिवडेकर, संतोष अरगडे, गणेश लोणारे, सुधीर नवले, चंदु मेनसे, अक्षय दिक्षित, सागर शिर्के यांनी सहभाग घेतला.

Share This News
error: Content is protected !!