पुणे : डेक्कन जिमखाना परिसरातील चॅम्पियन स्पोर्ट्स दुकानाला आग

440 0

पुणे : पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चॅम्पियन स्पोर्ट्स दुकानात आज सकाळी आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यात आली.

सकाळी नऊच्या सुमारास दुकानातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचं नागरिकांनी पाहिलं. त्यानंतर लगेचच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं.दुकान इमारतीच्या बेसमेंट मध्ये असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडचणी आल्या.

एरंडवणा, कसबा, कोथरूड येथील फायर गाड्या, अग्निशमन मध्यवर्ती केंद्राकडील टँकरच्या सहाय्याने तसेच तीन अधिकारी आणि 15 जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर पाऊण तासात आग आटोक्यात आणण्यात आली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Share This News
error: Content is protected !!