#Pune Fire : भीमा कोरेगांव एआयएम कंपनीमधे 8 सिलेंडरचा स्फोट; दोन कामगार जखमी
पुणे : नगर रोडवरील भीमा कोरेगांव एआयएम (AIM) कंपनीमधे आज दुपारी 12 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये कमर्शियल वापरासाठी असलेलया ८ सिलेंडर चा स्फोट झाला आहे. कंपनीत असणारे जवळपास ५० सिलेंडर मधून ८ सिलेंडरचा स्फोट झाला आहे.
आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अग्निशमन दलाच्या १० फायर गाड्यांच्या मदतीने फायर ब्रिगेडच्या 50 अग्निशमन जवानांनी ५ तास शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. पीएमआरडीए अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन आधीकरी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र आधीकरी विजय महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले.
https://twitter.com/Topnewsmarathi/status/1604092246684733441?s=20&t=cA9d2kCNVC-6kHP9697eOQ
सुदैवाने या घटनेमध्ये जीवित हानी झाली नसून २ कामगार जखमी झाले आहेत. परंतु या कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
