पुणे : महापौर हा शब्द कसा आला माहित आहे का ? आजही फक्त महाराष्ट्रात ‘मेअर’ ऐवजी वापरला जातो ‘महापौर’ हा शब्द ! असा आहे रंजक इतिहास…

936 0

तुम्ही कधी हा विचार केलाय का ? की संपूर्ण भारतामध्ये ‘मेयर’ हा शब्द वापरला जात असताना आपल्या महाराष्ट्रामध्येच ‘महापौर’ हा शब्द कसा बरे वापरला जात असावा ? तर आज हा शब्द नक्की कसा आला या विषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.

तर या शब्दाचे निर्माते आहेत स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर… हो मेअरच्या ऐवजी मराठमोळा महापौर हा शब्द महाराष्ट्राला दिला आहे. तो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी….

खरंतर महापौर हा शब्द मराठी शब्दकोशातच नव्हता. जेव्हा भारतावर इंग्रजांचे राज्य होतं त्यावेळी मेयर हाच शब्द प्रचलित होता. एव्हाना आज सुद्धा भारत भरामध्ये मेअर हाच शब्द वापरला जातो. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मात्र महापौर हाच शब्द आता वापरला जातो. इंग्रज भारताला सोडून गेल्यानंतर सुद्धा आपल्या भारतामध्ये अनेक इंग्रजी शब्दांचं दान देऊन गेले होते. आजही आपण बऱ्याच वेळा म्हणतोच इंग्रज सोडून गेले पण भाषा मागे सोडली.

तर झालं असं की, अनेक प्रचलित इंग्रजी शब्दांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शुद्ध मराठी शब्द दिले. एक दिवस गणपतराव नलावडे हे पुणे शहराचे मेअर झाले. अशी बातमी सावरकरांना मिळाली होती. गणपतराव नलावडे हे सावरकरांना मानणारे होते. यावेळी अभिनंदनाचे पत्र सावरकरांनी नलावडे यांना लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी लिहिले की, ” पत्र पाठवण्यास विलंब होत आहे. क्षमस्व, मेअर या शब्दाला प्रतिशब्द काय असावा याचा विचार करत होतो. तो शब्द मिळाला ‘महापौर’ हा शब्द अधिक योग्य वाटतो.” आणि त्यानंतर पुण्याचे मेअर गणपतराव नलावडे यांच्या कार्यालया बाहेरची पाटी बदलली गेली. ‘मेअर ऑफ पुणे’ ही पाटी काढून तिथे महापौर अशी पाटी लावण्याचे आदेश स्वतः महापौर गणपतराव नलावडे यांनी दिले, आणि असा मिळाला महाराष्ट्राला ‘महापौर’ हा शब्द…

Share This News
error: Content is protected !!