PUNE CRIME : पुण्यात थरार; जर्मन बेकरी जवळ पूर्व वैमानस्यातून गोळीबार

634 0

पुणे : पुण्यातील जर्मन बेकरी परिसरात गुरुवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी दोन गटांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी इमरान हमीद शेख यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, तक्रारदार इमरान शेख आणि त्याचे मित्र हे वाढदिवस साजरा करण्यासाठी गेरा लेजेंड प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये असलेल्या हॉटेल रॉक वॉटर येथे गेले होते. यावेळी तक्रारदार इम्रान शेख यांच्यासह सागर कोळनटी विवेक नवघरे सागर गायकवाड बबन इंगळे, मल्लेश कोळी लॉरेन्स पिल्ले, गणेश पोळ क्रिश सोनवणे हे सर्व वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले असताना प्रकरणातील आरोपी सोन्या दोडमणी नटी उर्फ रोहण निगडे नितीन म्हस्के धार आज्या आणि इतर अज्ञात आरोपी यांनी सागर याच्यावर पूर्व वैमानस्यातून हल्ला केला यावेळी सागर कोळनटी यास हाताने मारहाण करण्यात आली. तसेच आरोपी सोन्या दोडमणी याने बंदुकीतून यावेळी गोळीबार केला आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!