#PUNE CRIME : मालामाल होण्याच्या नादात पुण्यातील 250 हून अधिक लोकांची 6 कोटी रुपयांची फसवणूक; म्हणे नासा आणि इस्रोमध्ये…

1095 0

पुणे : पुण्यातील 250 हून अधिक नागरिकांची सहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. चार जणांच्या टोळक्याने पुणेकरांना कोट्यावधीचा गंडा घातलाय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन परिसरात एका हॉटेलमध्ये चार जणांनी गुंतवणूकदारांसाठी बैठक बोलावली होती. यात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या संशोधन संस्था नासा मधील लोक भारतात येणार असून यावेळी शास्त्रज्ञ राईस पुलर या यंत्रावर संशोधन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

राईस पुलर या धातूच्या भांड्याला संपूर्ण जगात मागणी असल्यामुळे पुणेकरांनी एक लाख रुपये यामध्ये गुंतवले होते. यावरून या सर्वांना एक कोटींचा परतावा मिळेल अशी बतावणी या टोळक्याने केली होती. तसेच बनावट कागदपत्र तयार करून या नागरिकांकडून पैसे देखील जमा करून घेण्यात आले होते.

या चार भामट्यांच्या विरोधात बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर या चौघांचा आता तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!