मुलीचा लग्नासाठी नकार ! धमकीसाठी त्याने केला मुलीच्याच नावाचा वापर

708 0

भोसरी विधानसभेचे भाजप आमदार महेश लांडगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना धमकी देणाऱ्या इसमाकडून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आमदार महेश लांडगे यांना परिवर्तन हेल्पलाईनच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात मोबाईल क्रमांकावरून 30 लाखाची खंडणी दे अन्यथा जीवाला धोका आहे, अशा आशयाचा मेसेज पाठवण्यात आला आहे. त्या मॅसेजमध्ये बँक डिटेल देखील देण्यात आले होते. संबंधित बँक खात्यात पैसे जमा करण्याची सूचना देण्यात आली होती. तसेच इतर रक्कम ही एका ठिकाणी गाडीत ठेवण्यास सांगण्यात आले होते.

पुण्यातील मनसेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवण्यात आले होते. त्याचा दुरुपयोग करण्याची धमकी देत लवकरात लवकर 30 लाख रुपये द्यावे, अन्यथा तुमच्या मुलाला जीवे मारून टाकू, अशी धमकी खंडणीखोराने दिली होती.

पुण्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. ‘इलेक्शनच्या भानगडीत पडू नकोस. अन्यथा गोळ्या घालून मारू’ अशी धमकी व्हाट्सअप मेसेज करून देण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे त्यांच्याकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.

या सर्व धमक्या देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. इम्रान शेख असं आरोपीचे नाव आहे. या आरोपीकडून तपासामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून आरोपी इम्रानला एका मुलीसोबत लग्न करायचं होतं मात्र मुलीने लग्नाला नकार दिला. त्याचा राग मानात धरून या मुलानं या मुलीची बदनामी करण्याच्या हेतूने हा प्लॅन आखला त्यानंतर या मुलीच्या नावाने राजकीय नेत्यांना धमकी द्यायचा आणि त्या मुलीच्या गाडीचा नंबर सांगून त्या गाडीमध्ये रक्कम ठेवण्यासाठी सांगत होता.

Share This News
error: Content is protected !!