Beed:

पुण्यातून अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून मिळाली धक्कादायक माहिती

801 0

पुणे- पुणे शहरात पोलिसांनी (Pune Police)दोन दहशतवाद्यांना मंगळवारी अटक केली होती. हे दहशतवादी दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. या दहशतवाद्यांकडे पुणे पोलीस कसून तपास करत असून पोलिसांना धक्कादायक माहिती समजली आहे. हे दोघे पुणे शहरात दीड वर्षांपासून राहत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हे दोघे जण बॉम्ब बनवण्यात एक्स्पर्ट होते.

पुणे शहरात मंगळवारी दोन दशतवादी पकडले गेले होते. इम्रान खान आणि मोहम्मद साकी अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दोघे जयपूर सीरियल बॉम्ब ब्लॉस्ट (Jaipur serial bomb blast)प्रकरणातील फरार आरोपी आहेत. एनआयएने त्यांच्यावर पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. एनआयएने त्यांना मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते. दोघेही दीड वर्षांपासून बिनधास्तपणे ते पुणे शहरात राहत होते. हे दोघे बॉम्ब बनवण्यात निष्णात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे शहरात एनडीएसारखी लष्करी प्रशिक्षण संस्था आहे. डीआरडीओ पुण्यात आहे. दक्षिण कमांडचे मुख्यालय पुण्यात आहे. भारतीय लष्कराच्या अनेक महत्वाच्या संस्था पुण्यात आहेत. पुण्यातील या महत्वाच्या ठिकाणांचा ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्याचा दोघांचा प्रयत्न होता. त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाच्या गोळ्याही सापडल्या आहेत. या गोळ्या न्यायवैद्यक शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यांच्या लॅपटॉपमध्ये देशविघातक कृत्याची माहिती सापडली आहे. या प्रकरणाचा तपास दशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) देण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!